फ्रायडे रिलीज

June 5, 2009 10:59 AM0 commentsViews: 2

5 जून गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला प्रोड्युसर आणि मल्टिप्लेक्स यांच्यातला वाद आज अखेर संपला आहे. 12 जूनपासून मल्टीप्लेक्समध्ये हिंदी सिनेमे रिलीज होत असले तरी गेल्या ह्या वीकेन्डला मराठी आणि हॉलिवुडचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ' लग्नाची वरात लंडनच्या घरात ' हा मराठी सिनेमा रिलीज होत आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत भरत जाधव असून पॅडी, दिपाली सय्यद यांच्याही भूमिका आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन काळे यांचं आहे. या चित्रपटाविषयीचं खास आकर्षण म्हणजे याचे संपूर्ण शूटिंग लंडनला झाले आहे. त्यामुळे हा सिनेमा बघताना प्रेक्षकांना लंडनची यात्रा नक्की घडेल यात काही वादच नाही. याखेरीज हॉलिवुडचा स्टार ट्रेक हा सिनेमासुध्दा रिलीज होत आहे. 2233 मधली ही कथा असून, अंतराळातली अनेक गोष्टी या सिनेमात हाताळल्या आहे. जे.जे. आब्राम यांचं या चित्रपटाचं दिग्दर्शक असून क्रिस पाईनची मुख्य भूमिका आहे. सायफाय सिनेमा ज्यांना आवडतो त्यांच्यासाठी हा एक चांगला ऑप्शन आहे. आता मराठी सिनेमा बघायचा की हॉलिवुडचा हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे.

close