विधानसभेत महिला’राज’, विजयी महिलांची यादी

October 20, 2014 8:40 PM0 commentsViews:

woman_win20 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीत महिला आमदारांची संख्या 12 वरून 20 वर पोहोचली आहे. पण एकूण जागांच्या तुलनेत हे प्रमाण अवघे 7 टक्केही नाही. भाजपतर्फे सर्वात जास्त महिलांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यापैकी 50 टक्के महिला विजयी झाल्यात.

विजयी झालेल्या एकूण 20 महिलांमध्ये 11 महिला भाजपच्या आहेत.त्याखालोखाल काँग्रेसच्या 5, राष्ट्रवादीच्या 3 तर इतर पक्षाच्या 1 महिला आमदार आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेतर्फे एकही महिला उमेदवार विजयी झालेली नाही.

भाजपकडून पंकजा मुंडे, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, स्नेहलता कोल्हे, मोनिका राजळे, विद्या ठाकूर आणि मंदा म्हात्रे या महिला आमदारांनी विजयी झाल्या आहेत. तर राष्ट्रवादीकडून दिपीका चव्हाण,ज्योती कलानी आणि संध्या कुपेकर या महिलांनी विजय मिळवला आहे. काँग्रेसकडून काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण, सुशील कुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे, निर्मला गावीत, काँग्रेसच्या माजी मंत्रू वर्षा गायकवाड आणि यशोमती ठाकूर यांनी विजय सर केलाय.

भाजमधील विजयी महिला उमेदवार

1. प्रा. देवयानी फरांदे, नाशिक मध्य
2. सीमा हिरे, नाशिक पश्चिम
3. स्नेहलता कोल्हे, कोपरगाव
4. मोनिका राजळे, पाथर्डी
5. विद्या ठाकूर, गोरेगाव
6. मनिषा चौधरी, दहिसर
7. मेधा कुलकर्णी, कोथरूड
8. पंकजा मुंडे, परळी
9. संगीता ठोंबरे, केज
10. मंदा म्हात्रे, बेलापूर
11. माधुरी मिसाळ, पर्वती

राष्ट्रवादीतील विजयी महिला उमेदवार
1. दिपीका चव्हाण, सटाणा
2. ज्योती कलानी, उल्हासनगर
3. संध्या कुपेकर, चंदगड

काँग्रेसमधील विजयी महिला उमेदवार
1. अमिता चव्हाण, भोकर
2. निर्मला गावीत, इगतपुरी
3. प्रणिती शिंदे, सोलापूर मध्य
4. वर्षा गायकवाड, धारावी
5. यशोमती ठाकूर, तिवसा
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close