दुसर्‍याला मतदान करणार्‍या ‘त्या’ महिलेचा मृत्यू

October 20, 2014 10:59 PM0 commentsViews:

Image img_140122_nashikgolibar_240x180.jpg20 ऑक्टोबर : वेगळ्या उमेदवाराला मत दिलं म्हणून झेलूबाई वाबळे या वृद्ध महिलेला जिवंत जाळण्यात आलं होतं. सात दिवस मृत्यूशी झुंझ देऊन सदरील महिलेनं आज अखेरचा श्वास घेतला. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला.

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातल्या बाभुळ गावात मतदानाच्या दुसर्‍या दिवशी झेलूबाई वाबळे या महिलेनं शिवसेनेऐवजी राष्ट्रवादीला मतदान केलं असा आरोप करून तीन जणांनी या महिलेला जिवंत जाळलं होतं. अगोदर या महिलेनं ईव्हीएम मशीनमध्ये आपण तिसरं बटन दाबलं नाही म्हणून आपल्याला जाळण्यात आल्याची जबानी या महिलेनं पोलिसांकडे दिली होती. तिच्या जबानीनुसार पोलिसांनी तिघा संशयित आरोपींना अटकही केली. मात्र, नंतर आपली जबानी फिरवली आणि स्टोव्हाच्या भडक्यानं आपण भाजल्याचं पीडित महिलेने म्हटलं होतं. नाशिकच्या सीव्हील हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज या महिलेचा मृत्यू झाला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close