मल्टिप्लेक्स ओनर्स आणि प्रोड्युसर्समधला वाद संपला

June 5, 2009 12:44 PM0 commentsViews: 1

5 जून मल्टिप्लेक्स ओनर्स आणि प्रोड्युसर्स यांची मुंबईच्या यशराज स्टुडिओत गुरुवारी रात्री उशिरापर्यंत मीटिंग झाली. यात मल्टिप्लेक्स आणि प्रोड्युसर्समधला वाद अखेर संपला आहे. त्यामुळे येणा-या शुक्रवारपासून प्रेषकांना हिंदी सिनेमे बघायला मिळणार आहेत. नफा वाटपाबाबत बोलणी अखेरच्या टप्प्यात आली आहे आणि काय तोडगा निघाला ते लवकरच सांगण्यात येणार आहे. 12 जूनपासून मोठे बॅनर्सही आपले सिनेमा मल्टिप्लेक्समध्ये रिलीज करणार आहेत. नफा वाटपावरून, मल्टीप्लेक्सचे मालक आणि प्रोड्युसर यांच्यात गेल्या दोन महिन्यांपासून वाद सुरू होता.

close