सुरतमध्ये दिवाळी धमाका! बोनस म्हणून फ्लॅट्स, कार आणि हिर्‍यांची भेट

October 21, 2014 12:02 PM0 commentsViews:

diwali bonus

21 ऑक्टोबर :  दिवाळीनिमित्त आपली कंपनी आपल्याला काय भेट देणार याचा उत्सुकता तुम्हालाही वाटत असेलच. पण सुरतमध्ये एका हिरे व्यापार्‍याने आपल्या कर्मचार्‍यांना दिवाळीनिमित्त घर, कार आणि हिर्‍यांचे दागिने भेट म्हणून दिले आहेत.

हृषिकेश एक्सपोर्ट्स या कंपनीच्या मालकांनी त्यांच्या कर्मचार्‍यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित केला आहे. सुरतचे हिरे व्यापारी साजीभाई ढोलकिया यांनी त्यांच्या कर्मचार्‍यांना बंपर बोनस दिला आहे. दिवाळीनिमित्त साजीभाईंनी चक्क 200 कर्मचार्‍यांना घरं, 525 कर्मचार्‍यांना हिर्‍यांचे दागिने तर 491 कर्मचार्‍यांना कार दिवाळी भेट म्हणून दिल्या आहेत. यापेक्षा दिवाळीची आणखी चंगळ काय असू शकते, नाही का?

ज्या कर्मचार्‍यांनी यावर्षीचं टार्गेट पूर्ण केलं त्यांच्यासाठी ही खास भेट आहे. यासाठी कंपनीच्या 1200 कर्मचार्‍यांची निवड करण्यात आली. कर्मचार्‍यांना ही दिवाळी भेट देण्यासाठी ढोलकियांनी 50 कोटींचं बजेट ठेवलं होतं.

गुजरातमधला हिर्‍यांचा व्यापार सध्या तेजीत आहे. सुरतहून जगभरामध्ये हिर्‍यांची निर्यात होते. त्यामुळे या व्यापारातून कर्मचार्‍यांचीही भरभराट होणार आहे, अशी हमी या हिरे व्यापार्‍यांनी दिली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close