अटलांटिकमध्ये सापडलेले अवशेष एअर फ्रान्सचे नाहीत – ब्राझील एअरफोर्स

June 5, 2009 4:28 PM0 commentsViews: 1

5 जून अटलांटिक महासागरामध्ये ब्राझीलच्या किनार्‍यावर सापडलेले विमानाचे अवशेष अपघातग्रस्त एअर फ्रान्सच्या विमानाचे नाहीत, असं स्पष्ट झालं आहे. ब्राझीलच्या एअर फोर्सने तशी माहिती दिली आहे. अटलांटिक महासागरात सापडलेल्या लाकडाच्या काही वस्तू एअर फ्रान्सच्या एएफ-447 या विमानाच्या नाहीत. समुद्रात तरंगणारं तेलही या विमानाचं नाही, असं एअर फ्रान्सने सांगितलं आहे. हे सर्व अवशेष यापूर्वी अटलांटिक महासागरात फुटलेल्या एखाद्या जहाजाचे असतील, अशी शक्यता आहे. एअर फ्रान्सचं विमान रिओ-डे-जानेरोहून पॅरिसला जात असताना अटलांटिक महासागरावर भरकटलं होतं. त्यात 228 प्रवासी होते. त्यांचा अजून थांगपत्ता लागलेला नाही.

close