भाजपची चाचपणी, अपक्षांच्या मदतीने स्थापणार सरकार ?

October 21, 2014 4:59 PM0 commentsViews:

amit shah in kol21 ऑक्टोबर : सत्ता स्थापनेसाठी भाजपमध्ये हालचालींना वेग आलाय. भाजपने आता अपक्षांना सोबत घेऊन शिवसेनेला कात्रजचा घाट दाखवण्याची योजना आखली आहे. अपक्षांच्या साह्यानं अल्पमतातलं सरकार बनवण्यासाठी भाजपची चाचपणी सुरू आहे. यासाठी भाजप अपक्षांच्या संपर्कात आहे. भाजपला किमान 11 आमदारांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. भाजपला 123 जागा मिळाल्या आहेत. अपक्षांच्या 11 जागा मिळून 134 जागांचं गणित जुळून येतंय. यासाठी भाजपची चाचपणी सुरू आहे.

जुन्नरमधून एकमेव निवडून आलेले मनसेचे आमदार शरद सोनावणे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. तसंचट भारिपचे आमदार बळीराम शिरस्करही भाजपच्या संपर्कात आहे. त्याचबरोबर बच्चु कडू, बडनेराचे आमदार रवी राणा, बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर आणि विलास तरे यांचा पाठिंबा निश्चित समजला जात आहे. त्याचबरोबर मोहन फड(पाथरी), विनायक पाटील अहमदपूर, गणपत गायवाड, कल्याण पूर्व, महेश लांडगे- भोसरी, शिरीष चौधरी-अमळनेर, शेकापचे पंडित पाटील-अलिबाग या अपक्ष आमदारांशीही भाजपच्या नेत्यांची बोलणी सुरू आहे.

(सविस्तर बातमी लवकरच)

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close