नितीन गडकरींनी मुख्यमंत्री व्हावं -मुनगंटीवार

October 21, 2014 6:59 PM0 commentsViews:

mungandtiwar_on_gadkari21 ऑक्टोबर : नितीन गडकरींनी महाराष्ट्रात यावं आणि मुख्यमंत्रिपद सांभाळावे अशी सर्व भाजपच्या नेत्यांची इच्छा आहे असा खुलासा भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. नितीन गडकरींनी पक्षाचा आदेश आणि कार्यकर्त्यांची इच्छा समजून घ्यावी असा आग्रहही मुनगंटीवार यांनी केला.

सत्ता स्थापनेचा पेच भाजपसमोर असताना मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चाही रंगलीये. देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांची नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहे. तर आपण दिल्लीत खूश असून मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही असा दावा अनेक वेळा नितीन गडकरींनी केला. पण आज आयबीएन लोकमतच्या प्रतिनिधींनी भाजपचे नवनिर्वाचित आमदार सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया जाणून घेतली त्यावेळी मुनगंटीवार यांनी नितीन गडकरींनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा व्यक्त केली. भाजपने नितीन गडकरी यांना महाराष्ट्रात जाण्याचा सल्ला दिलाय. पण गडकरींनी दिल्लीत राहण्याचं पसंत केलंय. आमचं असं मत आहे की, नितीन गडकरींनी महाराष्ट्रात यावं आणि महाराष्ट्राची सेवा करावी. देशाची सेवा तर करावीच पण महाराष्ट्राची सेवा केली तर देशाची सेवा होईल. महाराष्ट्राला प्रगती पथावर नेलं पाहिजे. आज राज्याच्या सर्व भाजपच्या नेत्यांची इच्छा आहे की, गडकरींनी महाराष्ट्रात यावं जर गडकरींनी यावं अशी सर्वांची इच्छा असेल तर गडकरींनी सर्वांची इच्छा समजून घ्यावी असं मुनगंटीवार म्हणाले.

तसंच गडकरींचे आणि माझे चांगले संबंध आहे, पण निकालानंतर धामुधुमीमुळे माझा त्यांच्याशी काही संपर्क झाला नाही. पक्षांचे जर आग्रह केला तर त्यांनी आदेश मानला पाहिजे. सध्या भाजपला बहुमत मिळालं नाही अशा परिस्थिती गडकरींनी येऊन कमान सांभाळली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

देवेंद्र फडणवीस यांचं नाव जरी चर्चेत असलं तरी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे सगळ्यांना माहिती आहे. खुद्द फडणवीस यांनीही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचं स्पष्ट केलंय त्यांनीच नितीन यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा बोलून दाखवली होती असंही मुनगंटीवार म्हणाले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close