ऑस्ट्रेलियात मेलबर्नमध्ये आणखी एका भारतीयावर हल्ला

June 5, 2009 4:30 PM0 commentsViews: 4

5 जून ऑस्ट्रेलियात आणखी एका भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला झाला आहे. मेलबर्नमध्ये 20 वर्षांच्या अमरित पाल सिंग या मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्याला एका तरुणांच्या ग्रुपने मारहाण केली. अमरित पाल सिंग हरयाणाचा आहे. तो मेलबर्नमध्ये एके ठिकाणी पार्ट टाईम जॉब करतो. कामाच्या ठिकाणी जात असताना काही तरुणांनी त्याला मारहाण केली. गेल्या महिन्याभरात ऑस्ट्रेलियात भारतीयांवर झालेला हा दहावा हल्ला आहे.

close