पूंछच्या शिओ-पायामध्ये तणाव कायम

June 5, 2009 4:32 PM0 commentsViews: 2

5 जून पूंछ जिल्ह्यातल्या शिओ-पायामध्ये लष्करी जवानांनी दोन माहिलांचा बलात्कार करून त्यांचा खून केला. त्यामुळे संपूर्ण श्रीनगर गेल्या चार दिवसांपासून पेटलंय. काश्मिर खोर्‍यात महिलांनी रस्त्यावर उतरून निदर्शनं केली.आजच्या सलग पाचव्या दिवशीही तणाव कायम श्रीनगरमधला तणाव कायम आहे. आज सकाळी पोलीस आणि लोकांमध्ये चकमक झाली. निदर्शक महिलांनी घोषणा देत पोलिसांच्या गाड्यांमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी पोलिसांनी केलेल्या अश्रूधुराच्या मार्‍यात एका मुलाचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला होता. त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली होती.

close