पंतप्रधान मोदींची दिवाळी काश्मीर पुरग्रस्तांसोबत

October 21, 2014 11:22 PM0 commentsViews:

narendra modi21 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळीच्या दिवसात काश्मीरमध्ये असणार आहेत. जम्मू आणि काश्मीरवर कोसळलेल्या अस्मानी संकटामुळे काश्मीरमधल्या पुरग्रस्तासोबत ते दिवाळी साजरी करणार आहेत. मोदींनी याबद्दल ट्विटवर आपण दिवाळी काश्मीरमध्ये साजरी करणार असल्याचं जाहीर केलंय. सप्टेंबर महिन्यात आलेल्या पुराच्या तडाख्यातून काश्मीर अजूनही सावरलेलं नाही. त्यामुळे मोदींनी हा निर्णय घेतलाय. ओमर अब्दुलांनी त्यांच्या या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close