रेल्वेत महिलेला जिवंत जाळलं

October 21, 2014 11:26 PM0 commentsViews:

21 ऑक्टोबर : केरळमध्ये एका 45 वर्षांच्या महिलेला रेल्वेमध्ये जिवंत जाळण्यात आल्याची खळबळजनक घटना घडलीये. सोमवारी सकाळी कन्नूर आलापुडा एक्स्प्रेसमध्ये ही दुर्देवी घटना घडली. गाडी सुटायला काही वेळ बाकी होता. ही महिला यावेळी या डब्यात एकटीच होती. त्यावेळी काही अज्ञात व्यक्तीनी या महिलेला जिवंत जाळलं. यात तिचा मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. याप्रकरणी तक्रारही दाखल करण्यात आली आहे. या महिलेचा एका व्यक्तीशी वाद झाल्याची माहिती काही प्रवाशांनी दिलीय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close