शस्त्रास्त्र खरेदीत भ्रष्टाचार : सीबीआयचा तपास सुरू

June 5, 2009 4:34 PM0 commentsViews: 2

5 जून संरक्षण मंत्रालयाच्या शस्त्रास्त्र खरेदीत सर्वात मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या प्रकरणाचा सीबीआय तपास करतं आहे. शस्त्रास्त्र तयार करणार्‍या तीन मोठ्या कंपन्यांनी संरक्षण मंत्रालयातल्या काही बड्या अधिकार्‍यांना लाच दिल्याचं सीबीआयने सांगितलं आहे. यावर युपीए सरकारने सात कंपन्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची कारवाई केली आहे. यामध्ये इस्रायलच्या आयएमआय कंपनीचा समावेश आहे. आयएमआय कंपनीने बिहारमधल्या नालंदामध्ये शस्त्रास्त्रं कारखाना उभारण्यासाठी भारत सरकारशी बाराशे कोटी रुपयांचा करार केला होता. हा करार अलीकडेच झाला होता. या कंपन्यांच्या ब्लॅकलिस्टमध्ये सिंगापूर टेक्नॉलॉजी, पोलंडची बूमर या कंपन्यांचाही समावेश आहे.

close