देवीच्या शालूचा लिलाव

October 22, 2014 3:30 PM0 commentsViews:

22 ऑक्टोबर :  साडेतीन शक्तीपीठांपैकी एक अशी ओळख असलेल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीच्या शालूचा लिलाव काल पार पडला. कोल्हापूर शहरातल्या मानसिंग खोराटे यांनी 5 लाख 55 हजार रुपयांना हा शालू घेतला आहे. आजच्यालिलावामध्ये 6 भक्तांनी सहभाग घेतला होता. आंध्र प्रदेशातल्या तिरुपती देवस्थानकडून नवरात्रीमध्ये महालक्ष्मीला शालू दिला जातो. हा मानाचा शालू नवरात्रीमध्ये देवीला नेसवला जातो आणि त्यानंतर या शालूचा लिलाव केला जातो. त्याप्रमाणं आज हा लिलाव पार पडला. दरम्यान या लिलावामुळं देवस्थान समितीला लाखो रुपयांचं उत्पन्न मिळत असून गेल्या वर्षी या शालूचा लिलाव साडेसात लाख रुपयांना झाला होता.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close