बॉक्सर सरिता देवीवर निलंबनाची कारवाई

October 22, 2014 3:57 PM0 commentsViews:

sarita devi22 ऑक्टोबर : भारताची बॉक्सर सरिता देवीनं एशियन गेम्समध्ये मेडल न स्वीकारल्याबद्दल तिचं इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशनने निलंंबनाची कारवाई केलीये. तिच्याबरोबर तिचे प्रशिक्षक गुरबक्ष सिंग सधू यांचंही निलंबन झालंय. जागतिक फेडरेशनने केलेल्या निलंबनानंतर भारतीय बॉक्सिंग संघटनेनेही त्यांच्यावर बंदी घतली आहे. या बंदीमुळे सरिता देवी महिलांच्या बॉक्सिंग विश्वकरंडक स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही.

आशियाई क्रीडा स्पर्धेत पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे सरिता देवीला रौप्यपदकाला मुकावं लागलं. सेमी फायनलमध्ये दक्षिण कोरियाच्या बॉक्सरविरुद्धच्या मॅचमध्ये अव्वल कामगिरी करुनही सरिता देवीला पराभूत घोषित केलं गेलं होतं. त्यामुळे सरिताने पारितोषिक वितरण समारंभात सरिताने कास्यपदक घ्यायला नकार दिला. यावेळी सरिताला अश्रू अनावर झाले. मात्र थोड्यावेळाने कांस्यपदक हातात घेतले. खरं तर या सगळ्या प्रकरणी भारतीय टीमनं अपील केलं होतं. पण पंचांनी हे अपील फेटाळून लावलं होतं. मी कांस्यपदक घेण्यास नकार दिला यात मला काहीच चुकीचं वाटत नाही. मी जे काही केलं ते देशासाठी केलं. जेव्हा मला कास्यपदक दिले जात होते तेव्हा भारतीय ध्वज तिसर्‍या स्थानावर दिसले. हे पाहून मी स्वत:वर नियंत्रण ठेवू शकले नाही. मला रडू कोसळलं आणि कांस्यपदक घेण्यास नकार दिला असा खुलासा सरिताने सीएनएन आयबीएनकडे केला होता.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close