16 जूनला अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाजणार

June 5, 2009 4:37 PM0 commentsViews: 2

5 जून इलेक्शन बजेट मांडून सत्ताधार्‍यांनी विरोधकांची हवा काढून घेतली. त्यामुळे येत्या 16 जूनला चालू अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळण्याचा निर्णय घेण्यात आला. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. येत्या सोमवार आणि मंगळवारी अर्थसंकल्पावर चर्चा होईल. 15 जूनला अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. त्यानंतर 16 जूनला अधिवेशनाचं सूप वाजणार असल्याची माहिती संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे.

close