योगिता ठाकरे प्रकरणाची सीआयडी चौकशी – गृहमंत्र्यांचं आश्वासन

June 5, 2009 4:41 PM0 commentsViews: 7

5 जून गरज पडल्यास योगिता ठाकरे प्रकरणाची सी.आय.डी चौकशी केली जणार असल्याचं आश्वासन गृहमंत्री जयंत पाटील यांनी विधानपरिषदेच्या सभागृहात दिलं. योगिता ठाकरे प्रकरणी भाजप नेते नितीन गडकरी यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी जयंत पाटील यांनी गरज पडल्यास सीआयडी चौकशी करू असं सांगितलं. नागपूरच्या योगिता ठाकरे ह्या सात वर्षांच्या बालिकेचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांच्या गाडीत संशयादपद स्थितीत मृतदेह सापडला होता. आधी अपघाती मृत्यू म्हणून पोलिसांनी त्या घटनेची नोंद केली होती. अखेर जनमताचा रेटा पाहून गुन्हा नोंदवण्यात आला.

close