गुरुद्वार्‍यात दिवाळी उत्सव

October 22, 2014 8:41 PM0 commentsViews:

22 ऑक्टोबर : शिखांची दक्षिण काशी असलेल्या नांदेडमधील सचखंड गुरुद्वारात आजपासून दीपावली उत्सवास सुरूवात झालीये. तख्त स्नानाने आजपासून दिवाळी उत्सवास सुरूवात झालीये. शिख धर्मात मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी केली जाते. तब्बल सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केल्या जातात. तख्त स्नानाने दिवाळीची सुरूवात केली जाते. गुरुद्वारातील मुख्य जत्थेदार बाबा कुलवनात सिंघजी महाराज हे घाघरीया सिघला घाघर देऊन गोदावारीतून जल आनण्याचे आदेश देतात. नदी घाटावर पाण्याची पूजा आणि अरदास करुन घाघरीया सिघ पहिली घाघर भरून पाणी गुरुद्वारात आणतात. त्यानंतर हजारो भाविक पवित्र गोदावरी नदीतील पाणी आणून गुरूद्वारा साफ सफाई करतात. तीनवेळा गोदावरी नदीतून घाघरीने भाविक हे पाणी गुरुद्वारात आणतात. मुख्य गुरूद्वारा, गुरुद्वारामधील शस्त्रघरातील शस्त्रे, संपूर्ण गुरुद्वारा परिसर स्वच्छ करण्यात येतो. ऐतिहासिक शस्त्रे आणि गाभार्‍याची साफसाफाई गुरुद्वाराचे मुख्य जत्थेदार करतात. त्यानंतर चार दिवस दीपमाळेतील इतर कार्यक्रम साजरे केले जातात. तीनशे वर्षापासून ही पंरपरा नांदेडच्या हजुर साहिब तख्त सचखंड गुरुद्वारात सुरू आहे. तख्त स्नानासाठी देशविदेशातून शीख भाविक मोठ्या संख्येने नांदेडमध्ये दाखल झाले आहेत. मोठ्या भक्तीभावाने हे भाविक तख्त स्नानामध्ये सहभाग घेऊन सेवा करतात.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close