कॅनडा संसदेच्या इमारतीत गोळीबार,एक सैनिक ठार

October 22, 2014 10:15 PM0 commentsViews:

shots fired inside canadian parliament22 ऑक्टोबर : कॅनडाच्या संसदेच्या आत गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडलीये. संसद भवनाजवळच्या वॉर मेमोरियलवरही गोळीबार झाला. त्यामध्ये एका सैनिकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.पंतप्रधान स्टीफन हार्पर यांना संसदभवनातून सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आल्याची माहिती आहे.

प्रत्यक्षदशीर्ंनी दिलेल्या माहितीनुसार, संसद इमारतीत किमान 20 फैरी झाडण्यात आल्या. 2 ते 3 हल्लेखोरांनी केलेला हा अतिरेकी हल्ला असावा, असा अंदाज ओटावा पोलिसांनी व्यक्त केलाय. एका संशयित हल्लेखोराला ठार करण्यात यश आलंय. संसदेचं कामकाज पाहणार्‍या पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार 1 हल्लेखोर मुख्य प्रवेशद्वारातून संसदेत आला. या घटनेनंतर संसद, आसपासच्या इमारती बंद करण्यात आल्या आहेत. आसपासच्या रहिवाशांनाही घरातच राहण्याचे आदेश देण्यात आलेत. विशेष म्हणजे काहीच दिवसांपूर्वी कॅनडानं दहशतवादी हल्ल्याची भीती आणखी वाढल्याचं स्पष्ट केलं होतं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close