धनंजय मुडेंनी दिला आमदारकीचा राजीनामा

October 22, 2014 9:56 PM3 commentsViews:

dhanjay munde22 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीत सपाटून पराभवाला सामोरं जावं लागल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिलाय. विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा त्यांनी बारामतीमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांकडे पाठवलाय.

बीडमधल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी राजीनामा दिलाय. 2013 ला राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेची आमदारकी मिळाली होती . ांदाच्या विधानसभेत पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारत राजीनामा देत असल्याची माहीती धनंजय मुंडे यांनी दिलीय. धनंजय मुंडे बीडमध्ये परळीत भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांच्या विरोधात उभे राहिले होते. मात्र दहा हजार मतांच्या फरकाने धनंजय मुंडेंना पराभवाला सामोरं जावं लागलं. अखेर आज त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय. पण राष्ट्रवादी काँग्रेस धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारेल की नाही, याबाबत शंका आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • umesh jamsandekar

  धनंजय मुंडे साहेब पंकजाला जे बळ आणि सहानुभूती मिळाली त्यावरून तिचा विजय होणार हे निश्चित होत. तुम्ही कितीही जोर लावला असतास आणि राष्ट्रवादीचा आणखी कुणीही बडा नेता तिच्यासमोर असता तर त्याचही तेच झाल असत जे तुमच झाल.

 • munde

  Very good decision

 • munde

  parabhavache ekmev Karan Ajit Pawar
  Ani tyanche mutne

close