भाजप-सेना सरकारचा फैसला सोमवारी ?

October 22, 2014 11:07 PM0 commentsViews:

BJP And Shivsena22 ऑक्टोबर : एकीकडे दिवाळीचे फटाके फुटत आहे तर दुसरीकडे शिवसेनेत अजूनही धाकधुक सुरू आहे. गेली 15 वर्ष सत्तेपासून दूर राहिलेल्या सेनेनं सत्तेची सुवर्णसंधी न सोडण्याचं मनाशी पक्क केलंय. सेनेच्या नेत्यांनी दिल्लीवारी करून बिनशर्त पाठिंबा देण्याचा ‘मातोश्री’चा निरोप दिला आहे. पण आता यावर दिवाळीनंतर सोमवारीच चर्चा होणार आहे असं कळतंय.

सत्तेत भाजपला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेतही घडामोडी सुरू आहेत. युती करण्यासाठी दोन्ही पक्ष सकारात्मक असल्याचं शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी सांगितलंय. पण, युतीबाबत सोमवारनंतर चर्चा होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. सुभाष देसाई आणि अनिल देसाई यांनी मंगळवारी दिल्लीला जाऊन भाजप नेत्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर आज ‘मातोश्री’वर जाऊन त्यांनी दिल्ली भेटीचा तपशील पत्रप्रमुरख उद्धव ठाकरेंना दिला. सोमवारी चर्चा झाल्यानंतर सगळं काही अनुकुल राहिलं तर नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 28 किंवा 29 ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे. त्यासाठी विधानभवन मैदान, कुर्ल्यातील बीकेसी किंवा वानखेडे स्टेडियम या तीन ठिकाणांची चाचपणी केली जात आहे. पण, सुरक्षेच्या दृष्टीनं विधानभवन मैदानाला प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close