जरबेरा फुलांची वाढती मागणी

October 23, 2014 3:49 PM0 commentsViews:

23 ऑक्टोबर : दिवाळीमध्ये फुलांना जास्त मागणी आहे आणि सध्या जरबेराची फुलं लोकप्रिय आहेत. त्यामुळेच आता नांदेडमधल्या शेतकर्‍यांनी कापूस, सोयाबीन सोडून जरबेरा फुलांची शेती करायला सुरूवात केली आहे. जरबेरा फुलांची शेती करणार्‍या शेतकर्‍यांसाठी सुगीचे दिवस आहेत.

‘नांदेड जिल्ह्यात तब्बल 10 हेक्टर क्षेत्रात जरबेरा फुलांची लागवड केली जाते. सुरूवातीला शेड उभारणी आणी झाडे खरेदी साठी जवळपास तीन लाख रूपयांचा खर्च लागतो. त्यांनतर खत-पाणी आणी नियमीत देखभाल करावी लागते. जरबेराच्या एका झाडाला दिवसाआड दहा फुले येतात. तब्बल तीन वर्षांपर्यंत या झाडांना फुले येतात. सध्या जरबेराला मागणी जास्त असल्याने भाव देखील चांगला येत आहे. केवळ 20 गुंटे मध्ये दरमहा 50 हजार ईतक उत्पन्न शेतकर्‍यांना मिळत. जरबेरा घेणार्‍या शेतकर्‍याला वार्षिक पाच ते सात लाख रुपये मिळत असल्याने या शेतकर्‍यांना सुगीचे दिवस आहेत. चांगल उत्पन्न मिळ्याल्याने या शेतकरर्‍यांची दिवाळी यंदा चांगली साजरी होणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close