गडकरींना पाठिंबा देण्यार्‍या आमदारांना भाजपने दिली तंबी

October 23, 2014 4:45 PM0 commentsViews:

gadakari_suportars23 ऑक्टोबर :भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना मुख्यमंत्री करा अशी मागणी करणार्‍या आमदारांना पक्षानं समज दिल्याची माहिती सूत्रांनी IBN लोकमतला दिलीये. परस्पर भूमिका जाहीर करू नका, अशा घटनांमुळे नवे वाद निर्माण होतात. त्याचा पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होतो त्यामुळे नवे वाद आणि गोंधळ टाळण्यासाठी पक्षानं अशी समज दिली.

गडकरींना मुख्यमंत्री करा अशी मागणी विदर्भातल्या 40 आमदारांनी केली होती. तसंच पुर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे आणि हिंगण्याचे आमदार समीर मेघे या तिघांनीही गडकरींसाठी आमदारकी सोडण्याची तयारी दाखवली होती. मंगळवारी नितीन गडकरींनी नागपूरमध्ये आगमन झालं होतं. तेव्हा त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं होतं. विदर्भातील 40 आमदारांनी गडकरींची भेट घेतली होती. गडकरींनी मुख्यमंत्री व्हावे अशी विनंतीही या आमदारांनी केली होती. एवढेच नाहीतर भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार आणि विनोद तावडे यांनीही गडकरी मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती. विशेष म्हणजे बुधवारीचसंघ परिवाराने मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मान्यता दिली होती. त्यानंतर आज भाजपने आमदारांना तंबी दिली.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close