रायगड दुमदुमला शिवराज्याभिषेक सोहळ्याने

June 6, 2009 8:05 AM0 commentsViews: 45

6 जून रायगडावर काल शुक्रवारी शिवाजी महाराजांचा 336 वा शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा तिथीप्रमाणे उत्साहात साजरा करण्यात आला. सोहळ्याआधी गडावरच्या देवी – देवतांची पूजा करण्यात आली. तर जगदीश्वर मंदिरात अभिषेक झाला. मैदानी खेळ आणि पोवाडा असे कार्यक्रम यानिमित्त ठेवण्यात आले होते. या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. शनिवारी तो कॅलेंडरप्रमाणे साजारा झाला. आजही दिवसभर शिवराज्यभिषेक दिन सोहळ्याच्या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सोहळ्यासाठी रायगडावर कालपासूनच शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली.राज्याभिषेकाच्या आजच्या दुस-या दिवशी गडावरच्या सभामंडपापासून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. होळीच्या माळावरून हळुहळु मैदानी खेळ करत हा पालखी सोहळा जगदीश्वर मंदीर आणि शिवसमाधीकडे मार्गस्थ झाला. शिवप्रेमींचा अलोट उत्साह आणि राज्याभिषेक दिनासाठी आलेले असंख्य कार्यकर्ते यांच्या घोषणा आणि शिवगर्जनांनी रायगड दुमदुमून गेला.

close