पाथर्डी दलित हत्याकांड प्रकरणी पुरावे मिळुनही कारवाईत टाळाटाळ

October 24, 2014 2:58 PM0 commentsViews:

parthardi
24 ऑक्टोबर : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीतील जवखेडामधील तिहेरी दलित हत्याकांड प्रकरणी पोलिसांना सबळ पुरावे देऊनही कारवाईत टाळाटाळ होतेय असा गंभीर आरोप मृत संजय जाधव यांचे भाऊ रवींद्र जाधव यांनी केला आहे. त्याचबरोबर आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची व आपल्या कुटुंबाला संरक्षण देण्याची मागणी संजय जाधव यांच्या आईवडिलांनी केली आहे. राजकीय दडपणामुळे पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय. सामाजिक संघटनांनी काल मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी 24 तासांत आरोपींना अटक करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिलं होतं मात्र अजूनही ते आश्वासन पूर्ण केलेल नाही त्यामुळे कार्यकर्त्ये संतप्त झाले आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close