रायगडावरील छत्रपतींचा पुतळा मेघडंबरीत कायम

June 6, 2009 8:08 AM0 commentsViews: 4

6 जून, रायगड विनोद तळेकर रायगडावर स्थानापन्न झालेल्या छत्रपती शिवरायांच्या 700 किलोचा पुतळा आता बसवलेल्या ठिकाणीच असावा अशी मागणी करत हजारो शिवप्रेमींनी हा पुतळा हलवण्याला तीव्र विरोध केला. अखेर शिवप्रेमींच्या मागणीला मान देत सभामंडपातील मेघडंबरीतच शिवपुतळा कायम ठेवण्याचा निर्णय सध्या घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी फोनवरून बोलणं झाल्यानंतर पुतळा मेघडंबरीतच ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे. दोन संस्थांचा वाद आणि पुतळा बसवण्यावरून होत असलेली दिरंगाई , यावर आधीच शिवप्रेमींमध्ये नाराजी होती. काही मराठा संघटनांनी पुतळा बसवण्याच्या आणि पुतळ्याच्या बैठकीला आक्षेप घेतला होता. त्यातच पुतळा हलवण्यावरून किंवा दुसर्‍या जागी बसवण्याला तीव्र विरोध करण्यात आला. त्यामुळे शिवप्रेमींनी रायगडावर घोषणाबाजीही केली. अखेर शिवरायांचे वंशज छत्रपती संभाजीराजे यांनी सगळ्यांची समजूत काढत, सध्यातरी पुतळा आहे त्याच स्थितीत ठेवण्याचा निर्णय झाला असल्याची घोषणा केली आहे.

close