पाथर्डी तिहेरी दलित हत्याकांड प्रकरणी अॅट्रोसिटी दाखल

October 24, 2014 5:08 PM0 commentsViews:

pathrdi

24 ऑक्टोबर :पाथर्डी तिहेरी दलित हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी अखेर अ‍ॅट्रॉसिटीचं कलम लावलंय. पिडीत जाधव कुटुंबाला संरक्षण मिळावं अशी मागणी त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे. हे हत्याकांड घडून 4 दिवस झाले, तरीही आरोपी मोकाट आहेत. त्यांच्या तपासासाठी 5 पथकं तयार केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशीही मागणी जाधवांच्या कुटुंबीयांकडून करण्यात येतं आहे.

दरम्यान, या घटनेचा निषेधार्थ आणि दलितांवर होणार्‍या अन्यायाचा निषेध करण्यासाठी आज बारामतीत विविध सामाजिक संघटनांच्यावतीने निषेध मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी दलितांवर होणार्‍या अत्याचाराबाबत सरकार उदासीन असल्याचा आरोप दलित समाजातील कार्यकर्त्यांनी केला आहे. तर अमरावतीतही आरपीआय गवई गटाच्या कार्यकर्त्यांनी येथील अर्विन चौकात प्रशासनाचा पुतळ्याचे दहन करुन निषेध नोंदवला आहे. आरोपींना त्वरित अटक न केल्यास अमरावतीमध्ये राज्यपालाना घेराव घालणार असल्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close