मुंबईत ‘क्लिक निक्सन’ स्टुडिओला आग

October 25, 2014 11:35 AM0 commentsViews:

chandivli aag

25 ऑक्टोबर :   मुंबईतील चांदिवली भागात असलेल्या ‘क्लिक निक्सन’ स्टुडिओला काल (शुक्रवारी) रात्री साडे दहाच्या सुमारास आग लागली. यामध्ये छोट्या पडद्यावरील मालिकांचे सेट्स आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. ज्या वेळी ही आग लागली तेव्हा स्टुडिओमध्ये हिंदी सिरीयल ‘ये हे मोहब्बतेचं शूटींग सुरू होती. पण दिलासादायक बाब म्हणजे, यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नसून पोलिस अधिक तपास करत आहेत. शुक्रवारी रात्री स्टुडियोच्या शेजारी असलेल्या एका गोदामामध्ये लागलेली आग स्टुडिओमध्ये पसरल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीत छोट्या पडद्यावरील स्टार प्लसवरच्या ‘ये हैं मोहब्बतें आणि झी टीव्हीवरील ‘कुम कुम भाग्य’या मालिकांचे सेट जळून खाक झाले आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close