निलेश राणे यांच्या बॉडीगार्डने केली रिक्षाचालकांना मारहाण

June 6, 2009 9:15 AM0 commentsViews: 1

6 जून वांद्रे पश्चिम इथल्या टर्नर रोड परिसरात असणा-या निलेश राणे यांच्या बॉडीगार्डने तवा रेस्तराँसमोर तीन रिक्षाचालकांना मारहाण केली. तवा रेस्तराँच्यासमोर ट्रॅफिक जाम असताना निलेश राणे यांची गाडी तिथे आली. त्यावेळी गाडीला पार्किंगसाठी मोकळी जागा नव्हती. तर जागा मोकळी करण्यासाठी निलेश यांच्या बॉडीगार्डसने रिक्षाचालकांना मारहाण केल्याची माहिती कळली.

close