शरद पवारांनी केलं मोदी सरकारचं कौतुक

October 25, 2014 3:33 PM1 commentViews:

BL01_MODI_PAWAR_1739859f
25 ऑक्टोबर :  मोदी सरकारला बरंच काही करायचंय असं दिसतंय, आपण सरकारला काम करण्यासाठी वेळ दिला पाहिजे अशा शब्दांत शरद पावारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारचं कौतुक केलं आहे.  मंत्रिमंडळाचा आकार लहान असला तरी पण केंद्र सरकारला काम करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. त्यामुळे मोदी सरकारबद्दल सध्या आपली ‘वेट ऍण्ड वॉच’ची भूमिका असल्याचं पवारांनी सांगितलं आहे.

दरम्यान, पवारांच्या या वक्तव्यावरून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी सडकून टीका केली आहे. जिकडे सरशी तिकडे पारशी अशी पवारांची नेहमी भूमिका राहिली आहे, अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला. आधी सोनिया गांधींना विरोध केला आणि शेवटी त्यांच्यासोबतच सरकार स्थापन केलं.या निवडणुकीत त्यांनी मोदींना विरोध केला आणि आता त्यांचीच स्तुती करतायत, यावरून त्यांचा हेतू स्पष्ट होतो असं महादेव जानकर म्हणाले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना भाजपचं सरकार याव अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • umesh jamsandekar

    शरद पवारांनी मोदींच कौतुक केलेलं नसून सहानुभूती मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय .

close