पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते एच एन रिलायन्स हॉस्पिटलचं उ‍‌द्‌घाटन

October 25, 2014 4:47 PM1 commentViews:

B0yhkPTCAAEMasV

25 ऑक्टोबर :   सर एच एन रिलायन्स फाऊन्डेशन हॉस्पिटलचं आज उ‍‌द्‌घाटन होतं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या हॉस्पिटलचं उ‍‌द्‌घाटन होणार आहे. हे हॉस्पिटल 1925 साली बांधण्यात आलं होतं. आता या हॉस्पिटलचा विस्तार करण्यात आला असून आता याचं रूपांतर 19 मजली अत्याधुनिक सोयींनी उपयुक्त हॉस्पिटलमध्ये करण्यात आलं आहे.

अमेरिकेतल्या जॉन्स हॉपकिन्स, एम डी अँडरसन कॅन्सर इन्स्टिट्यूटस, मॅसेच्युसेट्स जनलर हॉस्पिटल आणि युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया या इन्स्टिट्यूटसशी हे हॉस्पिटल संलग्न आहे. या हॉस्पिटलमध्ये गरीबांसाठी एक पंचमांश बेड्स राखीव ठेवण्यात आलं असून आणि 10 टक्के बेड्स मोफत उपचारांसाठी राखीव आहेत. इतर 10 टक्के बेड्स कमी दरात उपलब्ध असणार आहेत. गरीबांसाठी दर आठवड्यातून एकदा इथे मोफत ओपीडीसुद्धा ठेवण्यात आली आहे. त्याशिवाय या हॉस्पिटलमध्ये गरीबांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

मोदींचं भाषण

मोदींनी हे हॉस्पिटल गरिबांच्या उपचारासाठी उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. गरिबातील गरीब व्यक्तीलाही आरोग्य सेवा मिळायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याशिवाय लहान मुलं आणि मातांच्या मृत्यूचं प्रमाण चिंताजनक असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच रिलायन्स हॉस्पिटलच्या मदतीने टेली मेडिसीनच्या माध्यमातून खेड्यापाड्यापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणं शक्य असल्याची आशा मोदींनी व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यासाठी यूएनकडे पाठपुरावा करत असल्याचंही पंतप्रधानांनी यावेळेस सांगितलं. देशाचा विकास केवळ सरकारकडूनच शक्य नाही, त्यासाठी नागरिकांचं योगदानही महत्त्वाचं आहे, असंही पंतप्रधान मोदींनी नमूद केलं.

दिग्गजांची हजेरी

रिलायन्सच्या या हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली. बॉलिवूडचे सर्व अभिनेते, यामध्ये बिग बी अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन, शाहरूख खान, आमीर खान, करिना कपूर, राणी मुखर्जी, ऋषी कपूर, सैफ अली खान, सोनू निगम, गुलझार, सोनाक्षी सिन्हा, सोनम कपूर आदींनी हजेरी लावली. याशिवाय मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसह उपस्थित होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • ganesh

    भारत देशाला मोदीं सारखे पंतप्रधान भेटले आहे हे आपले भाग्याच म्हणावे लागेल
    आता भारताला जगामधे अव्वल क्रमांकात लवकरच पाहु