ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांची प्रकृती अत्यवस्थ

October 25, 2014 4:59 PM0 commentsViews:

sadashivjpg25 ऑक्टोबर : ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. त्यांच्यावर सध्या मुंबईतल्या कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

अमरापूरकर यांना फुफ्फुसांचा विकार झाल्याचे डॉक्टरांतर्फे सांगण्यात आलं आहे. त्यांचा लंग फायब्रोसिसचा त्रास वाढल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. 63 वर्षांचे अमरापूरकर यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटांत लक्षवेधी भूमिका केल्या असून ‘सडक’ या हिंदी चित्रपटातील तृतीयपंथीयाची भूमिका विशेष गाजली. त्यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे. एक उत्कृष्ट अभिनेते म्हणून प्रसिद्ध असलेले अमरापूरकर यांची सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही विशेष ओळख आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close