इतिहासाच्या पुस्तकात छत्रपतींचे गुरू म्हणून दादोजी कोंडदेव यांचं नावं वगळलं

June 6, 2009 9:22 AM0 commentsViews: 146

6 जून, मुंबई यंदाच्या इतिहासाच्या पुस्तकातून ' दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू ' असल्याचा उल्लेख वगळण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात ' शिवाजी महाराजांचं शिक्षण हे दादोजी कोंडदेव यांच्या देखरेखी झालं होतं, असा उल्लेख गेल्या वर्षीच्या इतिहासाच्या पुस्तकात होता. तसंच फोटोसकट ती माहिती चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात प्रसिद्ध झाली होती.दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू होते. याला संभाजी ब्रिगेड आणि इतर मराठी संघटनांनी आक्षेप नोंदवला होता. या नव्या पुस्तकातल्या चित्रातही दादोजी कोंडदेव हे खूप पाठीमागे दाखवले आहेत.

close