मनोहर लाल खट्टर हरियाणाचे नवे मुख्यमंत्री

October 26, 2014 1:43 PM0 commentsViews:

khattu_0_0_0_0_0_0

26 ऑक्टोबर : मनोहर लाल खट्टर यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून आज (रविवारी) शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.

पंचकुला इथे हा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला होता. मनोहर लाल खट्टर यांच्यासह राम विलास शर्मा, ओम प्रकाश धनकड, अनिल विज, कॅप्टन अभिमन्यू, नरवीर सिंह, कविता जैन यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला भाजप अध्यक्ष अमित शहा, गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंदिया उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला अनेक भाजप कार्यकर्तेही उपस्थित होते. सुरक्षेसाठी 3 हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. हरियाणात भाजपनं पहिल्यांदा पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन केलं आहे. 90 सदस्यांच्या विधानसभेत भाजपला 47 जागा मिळाल्या आहेत.

मनोहर लाल खट्टर यांचा प्रवास

– 60 वर्षीय मनोहर लाल खट्टर हरियाणाचे पहिले भाजपचे मुख्यमंत्री
– खट्टर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत
– वयाच्या 24व्या वर्षी आरएसएसमध्ये प्रवेश
– संघाचे प्रचारक असल्यानं संघाशी जवळीक
– पहिल्यांदाच निवडणूक लढवून कर्नालमधून निवडून आले
– निवडणूक प्रचाराची रणनीती ठरवण्यात खट्टरांचा हातखंडा
– पंजाबी असलेले खट्टर अविवाहित आहेत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close