प्रदुषणाचा बळी, ठाण्यात शेकडो मासे मृत

October 26, 2014 3:13 PM0 commentsViews:

26 ऑक्टोबर : ठाण्यातील एका तलावात शेकडो मासे मृतावस्थेत आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. हा तलाव ठाण्याच्या कारागृहाशेजारी आहे. या कारागृहाच्या ड्रेनेजचे पाणी कोणत्याही प्रक्रियेशिवाय तलावात सोडण्यात येते. अनेक प्रकारचा कचरा यांत टाकण्यात येतो. तलावाच्या आजुबाजूलाही घाणीचे साम्राज्य परसलेले असते. तलावातील या प्रदुषणामुळेच हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. हा तलाव ठाणे कारागृहाच्या मालकीचा असल्याने अखेर तलाव साफ करायला सुरुवात झालीये. तसंच यापुढे असा प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात येणार आहे, असंही प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close