पद्मसिंह प्रकरणी विरोधकांचा विधानसभेत गोंधळ

June 8, 2009 8:44 AM0 commentsViews: 2

8 जूनविधानसभेत भाजपचे गटनेते एकनाथ खडसे यांनी आयबीएन-लोकमतच्या ओबी व्हॅनवर हल्ला करण्यासंदर्भात सरकारने हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पवनराजे निंबाळकर प्रकरणावरून विधानसभेत विरोधकांनी आज सरकारला विरोधकांनी धारेवर धरत जवळ जवळ 20 मिनिटं सभागृहाचं कामकाज तहकूब केलं. काँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याप्रकरणात पद्मसिंह पाटील यांना अटक करण्यात आल्यामुळे काल सकाळपासून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ' उस्मानाबाद बंद 'चं आवाहन केलं होतं. पाटील यांच्या अटकेमुळे आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांना लक्ष्य केलं. त्याचप्रमाणे 'आयबीएन-लोकमत 'च्या वृत्तसंकलानासाठी उभ्या असलेल्या ओबी गाडीवरही कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक केली होती. बाईकवरून पुढे जात त्या कार्यकर्त्यांनी आयबीएन लोकमतच्या ओबी गाडीवर दगडफेक केली. त्यावेळी त्यांना आटोक्यात आणण्यासाठी तिथे फक्त पोलिसांची एकच गाडी होती. आयबीएन-लोकमतच्या ओबी गाडीवर दगडफेक करण्याप्रकरणी उस्मानाबदचे नगराध्यक्ष दत्ता भणगरक, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते महेश देवकाते, चंद्रकांत काकडे, कुणाल निंबाळकर, विजय शेणगया या सगळ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य परिवहन बसच्या तोडफोड प्रकरणी आणखी दहा जणांना अटक करण्यात आलं आहे. आपल्या नेत्याच्या गुंडगिरीच्या बातम्या लोकांना दिसू नयेत यासाठी पद्मसिंह पाटील यांच्या गुंडांनी उस्मानाबादमध्ये केबल ऑपरेटर्सवर दबाव आणून आयबीएन-लोकमतचं प्रक्षेपणच बंद पाडलं आहे. आयबीएन-लोकमतच्या ओबी व्हॅनला केलेल्या नुकसानीची भरपाई राष्ट्रवादीने करावी, अशी मागणी भाजपचे गटनेते एकनाथ खडसे यांनी केली आहे.

close