गडकरी जेव्हा व्हॉट्स अॅपवरचा उखाणा वाचून दाखवता…

October 26, 2014 4:35 PM1 commentViews:

26 ऑक्टोबर : व्हॉट्स ऍपवर कधी काय शेअर होईल याचा नेम नाही. फोटो असो, व्हिडिओ असो किंवा जोक असो इथं सार काही माफ. निवडणुकीची निकालानंतर अनेकांची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. असाच एक किस्सा अमरावतीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या मामाकड़े खासगी कार्यक्रमासाठी आलेले असतांना घडला.

नितीन गडकरी यांनी चक्क त्यांच्या मोबाईलच्या व्हाट्स ऍपवर आलेला उखाणा वाचून दाखवला. तो असा..’घटस्फोटानंतर कमलाबाईचे पुन्हा शिवसेनेशी लग्न झाले तर ती बोहल्यावर नाव काय घेईल…असे म्हणत…इतिहासाच्या पुस्तकाला भुगोलाचे कव्हर….शिवसेनेचे नाव घेते मी राष्ट्रवादीची लव्हर”. मात्र यानंतर हा उखाणा गडकरी यांनी आपल्या कार्यकर्ते आणि पत्रकारासमोर म्हणून दाखवण्याचा उद्देश तरी काय..?कदाचित सरकार बसवण्यासाठी भाजपा शिवसेनेशी हाथ मिळवण्याची संकेत तर नाही ना.. गडकरींच्या या उखान्यामूळे चर्चेला उधाण आलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • umesh jamsandekar

    गडकरींनी घेतलेल्या उखाण्यामागे त्यांनी प्रामाणिकपणे आपल्या पक्षात चाललेल्या घडामोडीचे सत्य सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.

close