नाशिकमध्ये पेटवली 40 दुचाकी वाहनं

June 8, 2009 9:22 AM0 commentsViews: 7

8 जून, नाशिक नाशिक शहरात आज पहाटे अज्ञात गुंडांनी धुमाकूळ घालून सिडको परिसरातली 40 दुचाकी वाहनं पेटवून दिली. पल्सरवर आलेल्या अज्ञात व्यक्तींनी हा प्रक्रार केला आहे. पहाटे 3 ते 4 दरम्यान सिडको परिसरात हा प्रकार घडला. त्रिमूर्ती चौक, पवननगर या परिसरातील 40 दुचाकी पेटवून देण्यात आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये या प्रकाराला सुरुवात झाली होती. आज पहाटे पुन्हा ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. यात काही अज्ञात वाहनांसोबतच पार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या नागरिकांच्या गाड्याही जाळण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापचं वातावरण आहे. याप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

close