ऑस्ट्रेलियात भारतीयांवर हल्ले सुरूच

June 8, 2009 11:08 AM0 commentsViews: 2

8 जून मेलबर्न इथे कमलप्रीत सिंग या भारतीयाची कार रविवारी रात्री एका जमावाने पेटवली. त्यावेळी सुदैवाने त्या कारमध्ये कमलप्रीत सिंग नव्हता. मात्र या कार पेटवण्याच्या प्रकारामागे वर्णद्वेषाचं कारण नसल्याचा दावा ऑस्ट्रेलियन पोलिसांनी केला आहे. गेल्या पाच आठवड्यात भारतीयांवर झालेला हा 12 वा हल्ला आहे. त्या हल्ल्यात चार कार्सचं नुकसान झालं आहे. या चार कार्सपैकी तीन कार या भारतीयांच्या मालकीच्या होत्या. भारतीयांवरच्या हल्ल्यात नुकसान झालेल्या चार कारपैकी एक कार ही विक्रांत रतन या 22 वर्षांच्या ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची आहे. ' पेट्रोल टाकून कार पेटवण्यात आली असण्याची शक्यता विक्रांत रतन याने व्यक्त केली आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियात भारतीयांवर चाललेल्या या हल्ल्यांच्या विरोधात शेकडो भारतीय विद्यार्थ्यांनी सिडनी मध्ये निदर्शनं केली. ऑस्ट्रेलियन सरकारने भारतीयांच्या संरक्षणाची हमी दिली असताना ही असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे हल्ले का थांबायला तयार नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

close