कोण होणार भाजपचा मुख्यमंत्री ?, 28 तारखेला शिक्कामोर्तब

October 26, 2014 7:28 PM0 commentsViews:

fadnvis meet gadkari26 ऑक्टोबर : भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण ? हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे. भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक 28 तारखेला होणार आहे. या बैठकीसाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि राज्य प्रभारी जे.पी. नड्डा हे निरिक्षक म्हणून येणार आहेत. या बैठकीत मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री कोण ? यावरून अजून सस्पेन्स कायम आहे. भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. पण संघ आणि भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मान्यता मिळाल्याचं कळतंय. पण यावर अजून शिक्कामोर्तब झालेलं नाही. आता मात्र मुख्यमंत्री आणि सत्तास्थापनेच्या चर्चेला नव्याने सुरुवात झाली आहे. भाजपने दोन दिवसांनी अर्थात 28 तारखेचा मुहूर्त ठरवलाय. मंगळवारी सकाळी 11 वाजता भाजपच्या राज्य विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि राज्य प्रभारी जे.पी. नड्डा हे निरिक्षक म्हणून येणार आहेत. या बैठकीत मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या बैठकीसाठी सर्व आमदार आणि खासदारांना उद्या (सोमवारी) रात्रीपर्यंत मुंबईत येण्यास सांगण्यात आलंय. दरम्यान, त्याआधी आज भाजपचे नेते एकनाथ खडसेंच्या घरी भाजप नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे बैठकीला उपस्थित होते. शिवसेनेसोबत चर्चा सुरू असल्याचं या बैठकीनंतर स्पष्ट करण्यात आलं. शिवसेनेशी युती करण्याची भाजपची इच्छा असल्याचंही तावडे यांनी या बैठकीनंतर सांगितलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close