पद्मसिंह पाटील यांनी राजीनामा द्यावा – मुंडेंची मागणी

June 8, 2009 11:10 AM0 commentsViews: 1

8 जूनखासदार पद्मसिंह पाटील यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी आज संसदेत केली. त्यावेळी पद्मसिंह पाटील हे जर स्वत:हून त्यांच्या पदाचा राजीनामा देत नसतील तर त्यांना पक्षातून काढून टाकावं, अशीही मुंडे म्हणाले. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री असलेल्या पद्मसिंह पाटील यांसारख्या अनुभवी नेत्याला असं कृत्य शोभत नाही, असं म्हणत भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निषेध केला.उस्मानाबादचे काँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर यांची हत्या केल्याच्या आरोपावरून पद्मसिंह पाटील यांना सीबीआयने चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून 14 जूनपर्यंत त्यांना सीबीआय कोठडीत ठेवण्यात येणार आहे. पद्मसिंह पाटील यांच्या अटकेमुळे तसंच राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्याबाबतीत घेतलेलं मूक धोरण पाहता विरोधकांनी टीकास्त्र सोडलं आहे.

close