चला दापोलीला

October 26, 2014 9:39 PM0 commentsViews:

26 ऑक्टोबर : दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत. गोव्याकडे जाणारा पर्यटक आता कोकणाकडे वळायला लागल्याचंही दिसायला लागलंय. त्यामुळे कोकणातले समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजलेत. दापोली तालुक्यातल्या हर्णे, कर्दे, आंजरले,केळशी, कोलथरे, मुरुड या ठिकाणांना पर्यटकांनी विशेष पसंती दिल्याचं दिसून येतंय. दापोली तालुक्यातले समुद्रकिनारे सुरक्षित
असल्यानं पर्यटक दापोलीला पसंती देतात. मात्र, त्याचवेळी समुद्रकिनार्‍यांवर पायाभूत सुविधांचा अभाव असल्यानं पर्यटकांमध्ये नाराजी आहे. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close