पवनराजे हत्येप्रकरणी रामदास कदम यांनी मागितला गृहमंत्र्यांचा राजीनामा

June 8, 2009 11:12 AM0 commentsViews: 10

8 जूनखुनावर खून पडत असताना महाराष्ट्र सरकार गप्प बसलाय का, असा आरोप करत विरोधी पक्ष नेते रामदास कदम यांनी आज विधानसभेत गृहमंत्री जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्याचवेळी विरोधकांनी कलम 248 अन्वये स्थगन प्रस्तावाचीही मागणी केली. पद्मसिंह पाटील यांची अटक हा राष्ट्रवादीला टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री जयंत पाटील यांनी पद्मसिंहांच्या अटकेवर दिली आहे. त्यावेळी ' पवनराजे यांच्या हत्येची सीबीआय चौकशी आणि तपास चालू आहे. त्यामुळे आत्तापर्यंत तरी कोणता निष्कर्ष काढू नये. सीबीआयचा अंतिम निकाल येईपर्यंत तरी याच्यावर भाष्य करणं योग्य नाही, 'असंही गृहमंत्री जयंत पाटील म्हणाले आहेत. गृहमंत्र्यांच्या या प्रतिक्रियेवर विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

close