आम्ही अफझलखानाच्या सैन्यातले नाही हे सिद्ध झालं, तावडेंचा उद्धव ठाकरेंना टोला

October 27, 2014 9:46 AM0 commentsViews:

27 ऑक्टोबर :  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या उपस्थितीत सत्कार झाला, याचा अर्थ आम्ही अफझलखानाच्या फौजेतले नाही हे सिद्ध झालं, असा टोला भाजप नेते विनोद तावडे यांनी शिवसेनेला लगावला आहे.

पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या 77व्या वाढदिवसाच्या निमीत्तानं पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, विनोद तावडे आणि पराग अळवणी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते सत्कार झाला, म्हणजे आम्ही अफझलखानाच्या फौजेतले नाहीत हे सिद्ध झालं. याशिवाय जनतेनेही ते दाखवून दिलं आहे. यापुढे महाराष्ट्रात फक्त विकासाचं राजकारण होईलल, असं तावडे म्हणाले.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दिल्लीहून अफझलखानाच्या फौजा चालून येत आहेत, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचा धागा पकडून तावडे यांनी उद्धव ठाकरेंच्या जहरी टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, यंदाचा पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर पुरस्कार सुलोचना दिदी यांना देण्यात आला. यावेळी पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत कारकिर्दीची 60 वर्षे पुर्ण झाल्याबद्दल संगीत मैफिलीचं आयोजनही करण्यात आलं होत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close