गुजरातला ‘निलोफर’चा धोका

October 27, 2014 10:54 AM0 commentsViews:

nilofar

27 ऑक्टोबर :  गुजरातच्या किनारपट्टीला निलोफर या चक्रीवादळाचा धोका उद्भवला आहे. राज्य प्रशासनानं त्यासंबंधी दक्षतेचा इशारा दिला आहे.

अरबी समुद्रात कमीदाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे ‘निलोफर’ नावाचं चक्रीवादळ गुजरातच्या किनार्‍यावर धडकणार आहे. सध्या हे चक्रीवादळ अरबी समुद्रात घोंघावत आहे. मात्र ते गुजरातच्या दिशेनं येणार की पुढे सरकत ओमानच्या दिशेनं जाणार हे स्पष्ट नाही. त्यामुळे गुजरात प्रशासनाने राज्यात पूर्वतयारीवर लक्ष केंदि्रत केलं आहे.

चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं सरकल्यास सोसाट्याच्या वार्‍यासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. मात्र हे चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशात येऊन गेलेल्या हुदहुद चक्रीवादळापेक्षा कमी तीव्रतेचे असेल असंही सांगण्यात आलं आहे. दरम्यान, निलोफर चक्रीवादळामुळे गेले दोन दिवस ऑक्टोबर हिटचे चटके सोसणार्‍या मुंबई आणि ठाण्यात ढगाळ वातावरण आणि थंडी आहे. महाराष्ट्राला या वादळाचा थेट धोका नसला तरी येते काही दिवस राज्यात ढगाळ वातावरण व कमी तापमान जाणवणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close