12 वर्षांच्या मुलीची हातचलाखी, 7 लाखांचे दागिने लंपास

October 27, 2014 12:22 PM0 commentsViews:

Talegao robbery

27 ऑक्टोबर :  पुण्याजवळच्या तळेगाव येथे एका 12 वर्षांच्या लहान मुलीने तब्बल 7 लाखांचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोनं खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या माय-लेकीने दुकानातील सुमारे 7 लाखांचे दागिने लंपास केले असून हा सर्व प्रकार दुकान्यातल्या सीसीटीव्हीत कैद झालं आहे.

अवघ्या 12 वर्षांच्या लहान मुलीने काही मिनिटांत तब्बल 27 तोळ्यांच्या दागिन्यांची चोरी केली आहे. सुदैवाने त्या मुलीची ही हातचलाखी दुकानातल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाली आहे. तळेगाव येथील धनराज ज्वेलर्स या दुकानात ही चोरी झाली आहे.

सोनं खरेदी करण्याच्या बहाण्यानं 2 महिला दुकानात शिरल्या आणि त्यानंतर तिने आपल्यासोबतच्या मुलीला शिताफीने काऊंटरखाली ठेवलं. अवघ्या काही मिनिटांतच या मुलीनं दागिने लुटले आणि त्यांनी दुकानातून पोबारा केला.
धनराज ज्वेलर्सचे मालक समीर ओसवाल यांनी दुकानातील दागिन्यांची मोजणी केली असता, त्यांना सोन्याचे दागिने कमी असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं. या तपासात एका बारा वर्षाच्या मुलीने तिजोरीमध्ये असलेले सोन्याचे दागिने चोरल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

या प्रकरणी त्यांनी तळेगाव पोलिसांकडे तक्रार नोंदवली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस तपास करत आहेत. मात्र, अजून कोणाला अटक करण्यात आलेली नाही.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close