आणखी एका स्टिम्युलस पॅकेजची गरज – मॉन्टेकसिंग अहलुवालिया

June 8, 2009 5:00 PM0 commentsViews: 2

8 जून उद्योग क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणखीन एक स्टिम्युलस पॅकेजची आवश्यकता असल्याचं मत नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉन्टेकसिंग अहलुवालिया यांनी मांडलं आहे. नियोजन आयोगाचा पदभार स्वीकारल्यानंतर आज ते नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. सलग आठव्या महिन्यात निर्यातवृद्धी दरात घट झाली आहे. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्येही निगेटीव्ह ग्रोथ दिसत आहे. त्यामुळे आर्थिक तुटीमध्ये वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत उद्योग क्षेत्राला बळकटी देण्याची गरज व्यक्त होत आहे. त्यामुळेच मॉन्टेक सिंग अहलुवालिया यांनी स्टिम्युलस पॅकेजची घोषणा केली आहे. स्टिम्युलस पॅकेजची घोषणा करताना देशात कृषी क्षेत्रांबरोबर इतरही क्षेत्रांचा विकास झाला पाहिजे. मंदीच्या काळात सरकारने अनेक पाऊलं उचलली आहेत. तसंच त्याची परिणामकारकता वाढली पाहिजे, असंही अहलुवालिया यांनी स्पष्ट केलं आहे.

close