संताप आणि निदर्शनं

October 27, 2014 9:51 PM0 commentsViews:

27 ऑक्टोबर : पाथर्डी हत्याकांडाला आज आठ दिवस पूर्ण झाले. या हत्याकांडातले आरोपी अजूनही मोकाटच आहेत. याच्या निषेधासाठी आज पाथर्डीमध्ये बंद पाळण्यात आला. तर कोल्हापूर आणि भुसावळमध्ये आंदोलन करण्यात आलं. रिपाइंचे नेते रामदास आठवलेंनी आज दुसर्‍यांदा पाथर्डीला भेट दिली. आरोपींना लवकरात लवकर अटक झाली नाही तर 30 ऑक्टोबरला अहमदनगर बंद पुकारण्याचा इशाराही त्यांनी दिलाय.

पाथर्डीमध्ये कडकडीत बंद

या प्रकरणी सर्व दलित संघटनांनी केलेल्या आवाहनाननंतर आज पाथर्डीमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. या संतापजनक घटनेला आज आठ दिवस पूर्ण झाले आहेत पण अजूनही पोलिसांच्या हाती आरोपी लागलेले नाहीत. तपासासाठी पोलिसांनी आयजींच्या नेतृत्वाखाली 8 स्पेशल इन्व्हेस्टगेशन टीम्स स्थापन केल्यात. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. कालही काही नेत्यांनी घटनास्थळाला भेट दिली. याप्रकरणी चौकशीसाठी एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close