विधानसभेत गाजला मंत्र्यांच्या गैरहजेरीचा मुद्दा

June 9, 2009 3:11 PM0 commentsViews: 2

9 जून विधानपरिषदेत मंत्र्यांच्या उपस्थितीचा मुद्दा आज गाजला. ज्या खात्यांबाबत प्रश्न विचारले जाणार असतात त्याच खात्यांचे मंत्री वारंवार विधानपरिषदेच्या सभागृहात गैरहजर राहतात, असं विरोधकांचं आजच्या विधानपरिषदेत बोलणं होतं. या मुद्यावरून विरोधकांनी विधानपरिषदेत गोंधळ घातला. याच मुद्द्यावरून विधानपरिषदेचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं. संबंधित मंत्र्यांनी पुढील चर्चेसाठी सभागृहात उपस्थित रहावं अशा सूचना विधानपरिषद सभापतींनी मंत्र्यांना दिल्या. सभागृहात विजय वडेट्टीवार, नितीन राऊत आणि बबनराव पाचपुते हे तीनच मंत्री उपस्थित होते.

close