भाजपने शब्द पाळावा अन्यथा करार जाहीर करू -शेट्टी

October 28, 2014 1:43 PM2 commentsViews:

raju_shetty28 ऑक्टोबर :सत्तेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना कशा प्रकारे वाटा मिळावा यासंबंधीचा करार भाजपच्या कोअर कमिटीशी झालाय, असं संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलंय. या कराराचं भाजपनं पालन करावं जर असं झालं नाहीतर लिखित करार जाहीर करू असा इशाराच शेट्टी यांनी दिला. ते पुण्यात बोलत होते.

महायुती तुटली होती तेव्हा कोअर कमिटीच्या बैठकीत भाजपच्या नेत्यांनी आम्हाला आश्वासनं दिली होती. विधानसभेच्या निवडणुकीत जरी आम्ही निवडून आलो नाहीत पण ग्रामीण भागात भाजपच्या विजयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोठ्या प्रमाणात हिस्सा आहे असा दावाही त्यांनी केला. आम्ही काही स्वत:हून हिस्सा मागत नाही. जो काही लिखित करार झालाय तो भाजपने पाळावा एवढीच अपेक्षा आहे पण जर असं झालं नाहीतर लिखित करार जाहीर करू असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला.

काही प्रश्न ?

1. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि भाजपमध्ये असा लिखित करार झालाय का?
2. लिखित करार जर झालेला असेल तर तो लोकांसमोर का आणत नाही?
3. या करारात नेमके कोणते मुद्दे आहेत?

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Ravi Kesarkar

  खर बोलायचे तर यांना जनतेशी काही देणे घेणे नसते,जनतेच्या प्रश्नावर एवढे गंभीर होताना दिसत नाहीत. यांना फक्त सत्ते वाटा हवा असतो आणी त्याची ते नेहमी प्लानिंग करत असतात हे वरील गोष्टीवरून दिसून येते, सरकार येण्या अगोदर पासून यांचे प्लानिंग चालू असते आणी त्याकरिता ते एकमेकाकडून लेखी आश्वासन घेतात , भोळी भाबडी जनता यांना फसते … नुसता बाजार मांडलाय …

 • Pratik Sawant

  Hahaha Dhamki Mhanava Ka Yala!! Raju S. var he veal anhli BJP ne. :D :D :D
  Aoo Te BJP ahe BJP te SS cha 15 varsha che YUTI todu shaktat tar thumhi kay ahat ?
  NCP/Congress madhle 60 umedwar ( GUNDA ) tyane BJP madhe anle.. ata te NCP cha Pathemba he Ghetel,
  Te Sate sathi Kahi Karu Shaktat Raju S. Saheb!! :D :D
  Ugdha Ata Tari Dole..
  ( BolBacha Jabardast Party)

close